सावंतवाडी,दि.१७: वर्षा पर्यटन साठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली गावात उगम पावणारी हिरण्यकेशी नदी पात्र ओलांडून वाहू लागली आहे.
गेले 3-4 दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सवत्र पाणीच पाणी झाले आहे.
आंबोली गावातील ग्रामस्थ व पर्यटकांनी योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडावे असे आवाहन आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी ग्रामस्थाना व पर्यटकांना केले आहे.
आंबोली हिरण्यकेशी नदी पात्रातील गाळ गाळ केली कित्येक वर्षे उपसा न झाल्यामुळे दरवर्षी पूर सदृश्य परिस्तिथी निर्माण होत असे.
येथील कबूलयतदार प्रश्न प्रलंबित असल्यामुळे मुळे येथील शेतकऱ्यांना पूर परिस्थिती मुळे होणारे शेत पिकांचे नुकसान ही भेटत नाही.
प्रशासनाने या बाबत ठोस कार्यवाही करावी अशी मागणी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केली आहे.