भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची कमिन्स व सिप्लामध्ये निवड…

0
14

सावंतवाडी,दि.२२: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ८९ विद्यार्थ्यांची कमिन्स व सिप्ला या नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे. डिझेल इंजिन्स बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कमिन्स मध्ये ५७ तर औषध निर्मितीसाठी प्रसिद्ध सिप्लामध्ये ३२ विद्यार्थ्याची निवड झाली आहे. हे सर्व विद्यार्थी कॉलेजच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे आहेत.

इंटरव्ह्यू कमिन्सच्या पुणे येथील व सिप्लाच्या गोवा प्लांटसाठी घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांना कॉलेजचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख मिलिंद देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले. या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here