सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा १९ एप्रिल रोजी पुरस्कार वितरण सोहळा

0
25

सावंतवाडी,दि.१७: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा २०२५ चा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा- शनिवार १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर बहुउद्देशीय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तसेच राज्याचे माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर, गोवा राज्याचे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमामध्ये सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने जाहीर करण्यात आलेले आदर्श पत्रकार पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत.

या सोहळ्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या पत्रकार आणि अतुलनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार सचिव मयूर चराटकर खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून श्रीपाद नाईक केंद्रीय मंत्री भारत सरकार उपस्थित राहणार आहेत. तसेच आम. दीपक केसरकर, माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, आमदार जीत आरोलकर ,मांद्रे-गोवा मतदारसंघ तथा अध्यक्ष गृहनिर्माण महामंडळ, गोवा राज्य, मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लि. शिवसेना जिल्हाप्रमुख,माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब, अॅड अस्मिता सावंत – भोसले संस्थापक अध्यक्षा, यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी चराठे, अच्युत सावंत – भोसले , कार्यकारी अध्यक्ष यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच उमेश तोरस्कर,अध्यक्ष-सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ, बाळ खडपकर,सचिव-सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ, अँड. संतोष सावंत खजिनदार, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ, गणेश जेठे, मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी, वसंत उर्फ अण्णा केसरकर ज्येष्ठ पत्रकार सावंतवाडी, गजानन नाईक ज्येष्ठ संपादक सावंतवाडी, अभिमन्यू लोंढे, ज्येष्ठ पत्रकार सावंतवाडी, अमोल टेंबकर, जिल्हाध्यक्ष, जिल्हा डिजिटल मीडिया सिंधुदुर्ग, महेंद्र किणी कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग सावंतवाडी, वैभव सगरे उपअभियंता सा.बां. विभाग सावंतवाडी, हेमंत निकम, प्रांताधिकारी सावंतवाडी, सौ अश्विनी पाटील, मुख्याधिकारी सावंतवाडी, बाबुराव धुरी माजी पंचायत समिती सदस्य दोडामार्ग, उदय भोसले, युवा उद्योजक सावंतवाडी, रूपेश राऊळ माजी पंचायत समिती सदस्य सावंतवाडी, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर माजी नगरसेवक सावंतवाडी, सुरेश गवस ज्येष्ठ नेते, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे वैद्यकीय अधीक्षक,सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यांची उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये पत्रकार
नागेश पाटील, वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार, अवधूत पोईपकर,कै. जयानंद मठकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, महादेव परांजपे,कै. पांडुरंग स्वार स्मृती जीवनगौरव पुरस्कार, प्रवीण परब नाट्यकर्मी कै. बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार, श्री विश्वनाथ नाईक आदर्श समाजसेवक कै चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार, अजित दळवी,ज्येष्ठ छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे स्मरणार्थ छायाचित्रकार पुरस्कार यांना प्रदान करण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार पुरस्कार निवड समितीचे गठण करण्यात आले होते यामध्ये डॉ. गिरीश कुमार चौगुले सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विनया बाड,आहार तज्ञ, उदय भोसले, युवा उद्योजक, ॲड. संदीप निंबाळकर,वकील प्रतिनिधी, सागर चव्हाण,माजी आदर्श पत्रकार विजेते, सचिन रेडकर ज्येष्ठ पत्रकार व निवड समितीचे पदसिद्ध पदाधिकारी म्हणून
हरिश्चंद्र पवार, अध्यक्ष,सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, मयूर चराटकर,सचिव रामचंद्र कुडाळकर खजिनदार.तसेच कै.प्रवीण मांजरेकर, सहसचिव, जिल्हा पत्रकार संघ सिंधुदुर्ग यांचाही या समितीत समावेश होता. 😎पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here