महाराष्ट्र युवा फाऊंडेशनचा सीताराम गावडे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

0
14

२५ फ्रेब्रुवारी ला पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सत्कार सोहळा

सावंतवाडी,दि.०७: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा व्यक्तींचा महाराष्ट्र युवा फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात येते, यावर्षी या पुरस्कारासाठी जेष्ठ पत्रकार व सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांची निवड करण्यात आली आहे,
सीताराम गावडे गेली पस्तीस वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत असून,त्यांनी भूषविलेल्या अनेक पदाना त्यानी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, जेष्ठ पत्रकार व सकल मराठा समाजाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव त्याना महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ देऊन करीत असल्याची माहिती या फाऊंडेशन चे अध्यक्ष गणेश विटकर यानी म्हटलेआहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पंचवीस तारीखला पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे,या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here