सावंतवाडी,दि.२६: गेली अठरा वर्षे वकीली व्यवसाय करीत असलेले सामान्य कुटुंबातील गरीबांचे वकील सिध्दार्थ भांबूरे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाली आहे.
ॲड. सिध्दार्थ भांबूरे २००८ पासून वकीली व्यवसायात आहेत, गोरगरिबांचे वकील म्हणून त्यांची ओळख आहे, सामान्य कुटुंबातील सिध्दार्थ भांबूरे यांची नोटरी पदी नियुक्ती झाल्याने सर्वसामान्य माणसाला त्याचा उपयोग होणार आहे यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.