सावंतवाडी,दि.१९ : शहरातील उभाबाजार बाल गोपाळ मित्र मंडळा च्या वतीने आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विविध कार्यक्रम करण्यात आले. भगवे फेटे घालून युवकापासून अबाल वृध्दानी सहभागी होत छत्रपती च्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष बाळ चोडणकर याच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बंड्या कोरगावकर, भरत पडते, बाळू कासार, तुषार कोरगावकर, शेखर धारगळकर, अरूण भिसे, काशीनाथ दुभाषी, समीर वंजारी, साक्षी वंजारी, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, कृतिका कोरगावकर, सुरेखा रांगणेकर, दुलारी रांगणेकर, रूतू रांगणेकर, करिश्मा वाळके, सपना चोडणकर, यशश्री कोरगावकर, पूजा वाळके, मयुरी नेरूरकर, विकी कारेकर, गौरव कारेकर, संजय कारेकर, सिध्देश धारगळकर, बेटा नार्वेकर, कपिल कोरगावकर, सोहम वंजारी, प्रशांत वाळके, किशोर वराडकर आदि उपस्थित होते.
यावेळी सैमित्र वंजारी यांनी शिवाजी महाराज यांची हुबेहुब वेशभुषा करत सर्वाचे लक्ष वेधले होते.