कु.वीरा घाडी जिल्ह्यात प्रथम ..तर मानवी घाडी द्वितीय
सावंतवाडी,दि.०७: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित दी स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सावंतवाडी नं.४ ची वीरा राजीव घाडी जिल्ह्यात प्रथम तर मानवी महेश घाडी जिल्ह्यात द्वितीय आल्या आहेत.
त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ मुख्याध्यापक व शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सावंतवाडी नंबर चार शाळा ही नेहमीच विविध उपक्रमात अग्रस्थानावर असते या शाळेतील शिक्षक यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो असे म्हणत कुमारी वीरा घाडी व मानवी घाडी यांनी शिक्षकांचे आभार मानले.