सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाकडून सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर..

0
8

सिंधुदुर्गनगरी,दि.२९: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. शनिवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत एक ज्येष्ठ व आठ आदर्श पत्रकार पुरस्कारांची निवड यावेळी करण्यात आले. पत्रकार दिनाच्या ६ जानेवारीच्या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा गौरव व सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी दिली.
कणकवली मधून ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे यांना ज्येष्ठ आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला. दोडामार्ग मधून वैभव साळकर, सिंधुदुर्ग नगरी मधून दत्तप्रसाद वालावलकर, मालवण मधून कृष्णा ढोलम, देवगड मधून सचिन लळीत, वेंगुर्ले मधून भरत सातोसकर, सावंतवाडी मधून सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कुडाळ मधून काशीराम गायकवाड, वैभववाडी मधून मारुती कांबळे यांची जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी बैठकीत आदर्श पुरस्कारासाठी निवड झाली. आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण पत्रकार दिनाच्या सहा जानेवारीला होणारे कार्यक्रमात होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ही निवड झाली. यावेळी गणेश जेठे, बाळ खडपकर, संतोष सावंत, संतोष राऊळ, बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर, प्रवीण मांजरेकर, लवू महाडेश्वर, महेंद्र मातोंडकर, अमित खोत, लक्ष्मीकांत भावे, राजन नाईक, किशोर जैतापकर, प्रशांत वाडेकर व सुहास देसाई आदी पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य यांनी ही आदर्श पत्रकार पुरस्कार निवड केली.
सिंधुनगरी येथील पत्रकार भवनात सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनाचा जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, प्रमुख वक्ते माधव भंडारी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत, व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी, पत्रकार हितचिंतकानी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here