उ.बा.ठा तरळे उपविभाग प्रमुख प्रथमेश उर्फ भैय्या खटावकर भाजपात दाखल

0
28

कणकवली,दि.२३: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. तरळे येथील उबाठा सेनेचे उपविभाग प्रमुख प्रथमेश उर्फ भैय्या खटावकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी श्री. खटावकर यांचे भारतीय जनता पक्षात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल असे आश्वासित केले.

यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, बाळा जठार, सरपंच हनुमंत तळेकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here