सावंतवाडीतील नागरिकांचा संबंधित प्रशासनाला सवाल…?
सावंतवाडी,दि.१८: मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीतील मोती तलावाच्या “त्या” तुटलेल्या कठड्याचे भूमिपूजन करून पंधरा दिवस उलटून गेले आहेत, मात्र अद्यापही या कामाला सुरुवात झालेली दिसून येत नाही तलावातील पाणी आटवल्यामुळे तलावातील मासे मरून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन प्रलंबित असलेले काम तात्काळ सुरू करावे असे सावंतवाडीतील नागरिकांकडून मागणी होत आहे.
दरम्यान गतवर्षी तलावातील गाळ काढतेवेळी या तलावाच्या कठाड्याला धक्का लागून पावसाळ्यात कठडा कोसळला होता. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत होते.
आता पुन्हा पावसाळा जवळ आला असून अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. पर्यटकांना भुरळ घालणारे आणि सावंतवाडीचा आत्मा असलेले मोती तलाव पुन्हा कधी सुस्थितीत होणार..? असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.