सावंतवाडी,दि.१८: येथील रवींद्र मंगल कार्यालय येथे युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
सावंतवाडी नं.०४ शाळेतील मुलांनी घवघवीत यश मिळवले. आज तालुका स्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमात मुलांना गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ मेडल्स देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.