ऑफ ग्रीड सोलर सिस्टीमने ११ शाळांना करणार वीज पुरवठा – वाढदिनी युवा नेते संदीप गावडे यांचा अभिनव संकल्प.

0
18

जिल्ह्यात प्रथमचं होणाऱ्या पायलट प्रोजेक्टचे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सावंतवाडी,दि.२९ : अलीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेची समस्या खूप वाढली आहे. त्याचा सर्वाधिक फटका शिक्षण व्यवस्थेला बसतो. म्हणून पारंपारिक ऊर्जास्रोताकडे आपण वळले पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून ऑफ ग्रीड सोलर यंत्रणेद्वारा अकरा प्राथमिक शाळांना वीजपुरवठा करून विजेची कमतरता दूर करण्यात येईल. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर करावा, असा संदेश दिला आहे. आमचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील सातत्याने अक्षय ऊर्जा वापराकडे विशेष कल दिला असल्यामुळे आगामी काळात ११ प्राथमिक शाळांना ऑफ ग्रीड सिस्टीमद्वारा वीज पुरवठा केला जाणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते संदीप गावडे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी संदीप गावडे पुढे म्हणाले की, या प्रकल्पाचा हा प्राथमिक टप्पा असून हा पायलट प्रोजेक्ट आहे. सदर प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर जशी गरज असेल तसा पुरवठा करण्यासंदर्भात विचार केला जाईल. जेणेकरून अक्षय ऊर्जा वापराकडे नागरिकांचा कल जावा व वीज वितरणावर येणारा अतिरिक्त ताण कमी व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. असे सांगत त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हा अभिनव संकल्प व्यक्त केला. तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत लवकरच या सोलर प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, अजय सावंत, गेळे सरपंच सागर ढोकरे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here