सावंतवाडी,दि.२८: सतत खंडित होत असलेला वीज पुरवठा,वाढीव वीज बिल, ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीची कोलमडून गेलेली यंत्रणा,अपुरा कर्मचारी वर्ग या सर्व प्रश्नावर जाब विचारण्यासाठी सावंतवाडी विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने सोमवार दि. २९ जुलै रोजी कुडाळ येथील वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा सावंतवाडी तालुका संघटक मायकल डिसोजा यांनी दिला आहे.
गेल्या दीड दोन महिन्यात वीज वितरण कंपनीच्या कारभाराची जी केविलवाणी व्यवस्था झाली ती या अगोदर कधीच झाली नव्हती.. पावसाळ्यापूर्वी झाडे झुडपे तसेच विदयुत वाहिनी दुरूस्ती करण्यासाठी जी यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे होती.. ती आवश्यकत्या
प्रमाणात न केल्यामुळे किंवा गाफील राहिल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना त्रास सहन करून, आर्थिक नुकसान ही झाले आहे.. विजेवर अवलंबून असलेले व्यापारी आज आर्थिक संकटात सापडले आहेत.
तसेच अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे यंत्रणा कुचकामी ठरत आहे..
सावंतवाडी तालुक्यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र गार झोपू गेले आहे.
तालुक्यातील जनतेला काळोखात ठेवण्याचा विडाच
वीज वितरण कंपनी व शासनाने उचला का यांचा जाब
विचारण्यासाठी शिवसेना उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते
वीज वितरण कंपनी कुडाळ कार्यालयातील अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालणार आहेत.