सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांना माजी आमदार राजन तेली यांचे भावनिक पत्र ..

0
25

तुमची साथ असेल तर.. कमळ चिन्हावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सुद्धा जिंकू.. राजन तेली

सावंतवाडी,दि.१६: खासदार नारायण राणे यांच्या रूपाने सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदार संघावर पहिल्यांदाच कमळ फुलले, जिल्ह्यात भाजपची ताकद पूर्वीपासूनच आहे.असे असून सुद्धा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा हवा तसा विकास झालेला नाही. मित्र पक्षांशी तडजोड करण्यासाठी किती वर्ष या मतदारसंघाचा बळी दिला जाणार आहे. या मतदारसंघाला आणखी किती वर्ष विकासापासून वंचित ठेवले जाणार आहे, याचा विचार करण्याची वेळ आता प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांवर आली आहे.
या मतदारसंघातल्या ७० टक्के ग्रामपंचायती,नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती,सोसायटी यांच्यावर भाजपचे वर्चस्व असून सुद्धा भाजपने शरणागती का पत्करावी..? हा विचार प्रत्येक कार्यकर्त्यांनी करायला हवा आपल्या वरिष्ठ नेत्यांना पटवून द्यायला हव आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जिंकला आहे आपण कमळ चिन्हावर सावंतवाडी सुद्धा नक्की जिंकू.. आज नाही तर कधीच नाही गंभीर होऊन विचार करा वेळ आपल्या हातात आहे. पक्षाच्या नेत्यांना हे पटवून देऊया या मतदारसंघात भाजपची ताकद आहे. हा मतदारसंघ भाजपला मिळाला पाहिजे असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे करूया अशा प्रकारचे भावनिक पत्र माजी आमदार राजन तेली यांनी आपल्या कार्यकर्त्यांना लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here