सावंतवाडी, दि.२८: मनुष्यापासून प्राण्यापर्यंत सर्वांसाठी देवदूत ठरणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांच्यामुळे आज विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे प्राण वाचले .दुपारपासून हा कुत्रा महादेव भाटले कवठणकर यांच्या घरासमोरील विहिरीत पडला होता. याबाबतची माहिती सिताराम गावडे यांनी रवी जाधव यांना देताच त्यांनी घटनास्थळी येत विहिरीत उतरून कुत्र्याला बाहेर काढून जीवदान दिले.
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अनेक जणांचे आधारवड बनलेले तसेच अनेकांचे जीव वाचवणारे रवी जाधव यांनी आज मुक्या प्राण्याचाही जीव वाचवला माधवभाटले येथील उघड्या विहिरीत कुत्रा पडल्याची माहिती सिताराम गावडे यांनी रवी जाधव यांना दिली रवी जाधव त्वरित घटनास्थळी दाखल झाले व विहिरीत उतरून त्या बुडणाऱ्या कुत्र्याला जीवदान दिले.
यावेळी संजय मुळीक,साईश गावडे, सीताराम गावडे,सौ कवठणकर यांची त्यांना मदत लाभली.