शिरशिंगेतील माजी विद्यार्थी व ग्रामस्थांकडून गावातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप..

0
76

सावंतवाडी,दि.२९: तालुक्यातील शिरशिंगे गावामध्ये माजी विद्यार्थी,चाकरमानी व ग्रामस्थ याच्या सहकार्याने गावातील तिन्ही जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल व चार अंगणवाडी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

गेल्या सात वर्षापासून दात्यांच्या सहकार्याने तिन्ही जि.प.शाळा, हायस्कूल व अंगणवाडी यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची परंपरा चालू आहे.

यावर्षीही भरत गावडे यांच्या माध्यमातून परमपूज्य अवधूतानंद महाराज धवडकी यांचेकडून ही शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाले.
या साहित्य वाटपासाठी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ अनिल राऊळ,महेश गोवेकर, उत्तम राऊळ, ज्ञानेश्वर राऊळ,अनंत राऊळ,संजय राऊळ, संतोष राऊळ,सिताराम शिर्के,पांडुरंग राऊळ, सुधाकर राऊळ,महेश निकम,गिरीष मेस्त्री,विजय राऊळ,उदय राऊळ, बापू राऊळ,वासुदेव राऊळ, महादेव राऊळ, विलास राऊळ, समीर धोंड, तुकाराम राऊळ या दात्यांनी सढळ हस्ते मदत केली.
दरम्यान निरोप समारंभाच्या निमित्ताने जि. प.शाळा शिरशिंगे इयत्ता सातवीच्या विद्यार्थी व गुरुजन वर्ग सोनटक्के,सांगेलकर,परब व सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा नं १ला कपाट भेट देण्यात आले.
या सर्व दात्यांचे सर्व शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक वर्ग,पालक वर्ग ,विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्याकडून सर्व दात्यांचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here