सावंतवाडी,दि.२१: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये आज दिनांक २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी योगाची विविध प्रात्यक्षिके मुलांनी शाळेच्या सभागृहांमध्ये केली. या मुलांना पतंजली सावंतवाडी शाखेचे भरत गावडे,श्री सावंत,श्रीमती पुराणिक,डॉक्टर कार्लेकर, डॉक्टर लेले मॅडम यांनी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली व योग करून घेतले. यावेळी सर्व मुलांनी योग प्रात्यक्षिकामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत यांनी मार्गदर्शकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी शाळेतील शिक्षक डी.जी. वरक,अमित कांबळे, श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ,श्रीमती प्राची बिले, श्रीमती स्वरा राऊळ,श्रीमती संजना आडेलकर,श्रीमती स्मिता घाडीगावकर इत्यादी सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.