मोफत बस सेवेला उत्तम प्रतिसाद..

0
24

वालावलकर रुग्णालयाचा रुग्णांसाठी अभिनव उपक्रम

चिपळूण,दि.२१: (ओंकार रेळेकर) कोकणातील वालावलकर रुग्णालय हे वैद्यकीय सुविधा पुरवण्यात कायमच अग्रेसर आहे. सावर्डे आणि डेरवण सारख्या लहानशा गावांच्या वेशीवर चिपळूण तालुक्यातील हे रुग्णालय म्हणजे रुग्णांचा आधार बनले आहे. रुग्णांचा वाढता ओघ पाहता त्यांना रुग्णालय गाठणे सोपे व्हावे आणि जास्तीत जास्त सामान्य लोकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा. या करिता रुग्णालय प्रशासनाने मोफत बस सेवेचा निर्णय घेतला आहे. एकाच छताखाली रुग्णाला एक्स रे, एम आर आय, सी टी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॅलाॅजी आणि सर्व वैद्यकीय अधिकारी यांची भेट ही एकाच दिवशी घेता यावी. त्यांचा वेळ वाचवा लवकर निदान व्हावे जेणेकरून आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच योग्य उपचार आणि जलद निदान व्हावे हा हेतू ठेवून रुग्णालय प्रशासनाने मोफत बस सेवेचा निर्णय घेतला आहे. चिपळूण – खेड या भागातील आणि त्यांना जोडणाऱ्या गावातील लोकांची सोय व्हावी म्हणून किरकोळ आजारांकरता चिपळूण बहादुर शेख येथही सन – २०१५ मध्ये रुग्णालयाची एक शाखा उभारली आहे. तेथे प्राथमिक तपासणी व आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी विवीध तज्ञ डॉक्टर्स ची भेट, एक्स रे रक्त तपासणीची सोय देखील करण्यात आली आहे. याचा लाभ अनेक मधुमेह रक्तदाब असे आजार असणारे रुग्ण घेत आहेत. या आरोग्याच्या धनसंपदेला जपण्याचा हा एक प्रयत्न वालावलकर रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या मोफत बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here