संदीप गावडे यांचा पुढाकार ; एफ. सी. सावंतवाडीच्या संघासाठी झाली निवड चाचणी
सावंतवाडी,दि.३१ : सावंतवाडीत जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणी आज संपन्न झाली. या निवड चाचणीसाठी मोठ्या संख्येने फुटबॉल खेळाडू उपस्थित होते.एफ.सी.सावंतवाडी संघासाठी एकुण २१ जणांची निवड करण्यात आली. दहा वर्षा खालील आणि दहा वर्षं वरील असे दोन संघ यावेळी कऱण्यात आले. यात एकूण ४० जणांनी सहभाग घेतला होता.
संदीप एकनाथ गावडे यांचा माध्यमातुन सावंतवाडी जिमखाना मैदान येथे मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि फुटबॉल निवड चाचणी घेण्यात आली होती.या शिबिराला खेळाडूंचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाभरातून या शिबिराचा खेळाडूंनी लाभ घेतला. प्रशिक्षक गिल्बर्ड डीकोस्टा, प्रशिक्षक एलपीलो पिंटो यांनी खेळाडू घडविण्यासाठी विशेष मेहनत घेतली. संदीप एकनाथ गावडे यांनी उचललेल्या पाऊलामुळे जिल्हातील खेळाडू घडतील अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांकडून येत आहे.