विशाल परब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप

0
34

सावंतवाडी,दि.२६: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून श्री देवी माऊली घोडेमुख युवक कला क्रिडा मंडळ, न्हावेली यांच्या संकल्पनेतून मोफत भात, बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा शुभारंभ न्हावेली पार्सेकरवाडी येथे विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला.

पावसाळा तोंडावर आहे आणि कोकणात भात पिकाचे बियाणे शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे असते. हीच गरज ओळखून विशाल परब यांनी शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुढे सरसावत बियाणे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

कार्यक्रम प्रसंगी मंडळ अध्यक्ष प्रसाद गावडे, उपाध्यक्ष समीर पार्सेकर, सचिव मोहन पालेकर, खजिनदार तुळसिदास पार्सेकर, संपर्क उपाध्यक्ष राज भवन, सुंदर पार्सेकर, बाबा गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here