दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे विशाल परब यांची हत्ती बाधित गावाला भेट !

0
41

दोडामार्ग,दि.१९: तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या कळपांनी गेल्या अनेक वर्षांपासून हैदोस घातला आहे. हे हत्तीचे कळप मोठ्या प्रमाणात पिकांची तसेच आसपासच्या परिसरात विविध गोष्टींची नासाडी करत आहेत. याचा स्थानिकांना मोठा फटका बसत आहे. समस्याग्रस्त तालुका म्हणून दोडामार्ग तालुक्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख आहे. आंदोलन केल्यानंतरच दोडामार्ग वासियांच्या समस्या सुटतात अशी कोकणात ओळख आहे.

मोर्ले ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी पावले उचलत ग्रामस्थांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावर या स्थानिक प्रश्नाला घेऊन आवाज उठवण्यासाठी तत्पर असेल. तसेच वीज प्रश्नाबाबत संबंधित विभागाला कळवून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आदेश देण्यात येतील, असे मत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here