जन कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाची विकासकामे करण्यावर भर देणार
सावंतवाडी,दि.०१: मयुर लाखे मित्र मंडळ आयोजित रंगिला चषक 2024 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे क्रिकेट खेळाडू स्पर्धकांना शुभेच्छा देत सन्मानाचा स्वीकार केला.
“पायाभूत सुविधांसह जन कल्याणाच्या दृष्टीने विविध समस्या आणि अडचणी आपल्यासमोर आहेत. आचारसंहिता असल्याकारणाने मी त्या तात्काळ सोडवू शकत नाही ; परंतु या पुढील काळात मी नक्कीच त्या सोडवण्यावर भर देईल. आपण देखील त्याचा पाठपुरावा माझ्याकडे करा, असे विशाल परब यांनी हक्काने उपस्थित लाखे वस्तीतील जेष्ठ नागरिकांसह युवा कार्यकर्त्यांना आवाहन केले.
या कार्यक्रम प्रसंगी परिसरातील जेष्ठ नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेट खेळाडू मोठ्या उपस्थित होते.