स्थानिकांना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास खपवून घेतले जाणार नाही..

0
55

भाजप आंबोली व चौकुळ मधील स्थानिकांच्या पाठीशी – संदिप गावडे

सावंतवाडी,दि .०७: आंबोली स्थानिक रहिवाशांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभी राहील त्यांना कोणताही त्रास होऊ देणार नाही, स्थानिकांना जर प्रशासन त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर भाजप त्याला जशास तसे उत्तर देईल स्थानिकांना वाऱ्यावर सोडणार नाही असे भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य माजी आंबोली मंडल अध्यक्ष अध्यक्ष संदीप गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
काहींनी आंबोली घाटापासून आजऱ्या फाट्यापर्यंत बेकायदा टपरी , बंगले, हॉटेल, बांधकामे तोडावीत अशी मागणी केली आहे ,यावर संदीप गावडे यांनी आंबोली ग्रामस्थांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभी राहिल, जे स्थानिक आहेत ज्यांच्या दहा पिढ्या या ठिकाणी झालेल्या आहेत त्यांचा न्याय हक्क आहे ते आपल्या जागेवर बांधकाम करू शकतात, त्यामुळे अशा लोकांना जर कोणी त्रास देत असेल तर भाजप स्थानिकांच्या पाठीशी पूर्ण ताकतीनिशी उभी राहील असा विश्वास भाजपा, माजी पंचायत समिती सदस्य आंबोली माजी मंडल अध्यक्ष संदीप गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून आंबोली वासी यांना दिला आहे.
स्थानिक रहिवाशांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य कोणीही करू नये, कारण आंबोलीतील म्हणा किंवा चौकुळ मधील म्हणा ते स्थानिक गावकर मंडळी आहेत ते गावाचा कारभार चालवतात गाव राटी प्रमाणे न्यायनिवाडा करतात तो त्यांचा अधिकार आहे व हा अधिकार परंपरेने त्यांच्याकडे चालत आलेला आहे, सद्यस्थितीत जरी सदरची जागा शासन म्हणून लागली असेल तरी ती जागा तेथील कसणाऱ्या ग्रामस्थांची आहे त्या जागेवर अन्य कोणी व्यक्ती हक्क सांगू शकत नाही, त्यामुळे कागदपत्रांचा आधार घेऊन कोणी स्थानिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर भाजप पूर्ण ताकदीनिशी स्थानिक जनतेच्या पाठीशी उभी राहील म्हणून स्थानिकांनी घाबरून जाऊ नये व विचलित पण होऊ नये असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here