कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी आणि मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत यांचे आयोजन..
सावंतवाडी दि.२५: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जानेवारी २०२३ रोजी मळेवाड प्राथमिक शाळा क्रमांक दोन येथे बाल साहित्य संमेलन व बाल संसद भरवण्यात येत आहे. यासाठी समिती ही गठीत करण्यात आली आहे. शालेय मुलांना साहित्याची गोडी लागावी आणि साहित्य प्रवाहात चळवळीत ही मुले शालेय जीवनापासूनच यावी, या उद्देशाने कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने आगळे वेगळे बालसाहित्य संमेलन आयोजित केले आहे.
या बाल साहित्य संमेलना संदर्भात नियोजन बैठक मळेवाड ग्रामपंचायत व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची कार्यकारणी बैठक संपन्न झाली. या बैठकीत बाल साहित्य संमेलन व बाल संसद भरवण्याच्या दृष्टीने निश्चित करण्यात आले . सावंतवाडी तालुक्यातील हा भाग साहित्य चळवळीत प्रवाहित करण्याच्या दृष्टीने मळेवाड मध्ये हा उपक्रम घेण्यात आला आहे.बाल साहित्य संमेलनात बुधवार दि.४ जानेवारी रोजी मळेवाड शाळा क्रमांक एक येथून ग्रंथदिंडी मळेवाड चौकापर्यंत येणार आहे .त्यानंतर या ग्रंथादिंडीचा समारोप 10:30 वाजता झाल्यानंतर शाळा क्रमांक २ येथे बाल साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता शाळकरी मुलांच्या हस्तेच केले जाणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता परिसंवाद, दुपारी १२.३० वाजता कवी संमेलन, त्यानंतर स्नेहभोजन. दुसऱ्या सत्रात दुपारी ३.०० वाजता साहित्य लेखक यांची मुलाखत, दुपारी ३.३०वाजता बाल साहित्य संसद हा नावीन्यपूर्ण उपक्रम जेणेकरून शालेय मुलांना न्यायालय प्रक्रिये बाबतची माहिती मिळावी या दृष्टीने उपक्रम घेतला जाणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता समारोप बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या बाल साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या बाल साहित्य संमेलनासाठी माळेवाड पंचक्रोशीतील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत. या संमेलनासाठी १५ जणांची समिती ही गठीत करण्यात आली आहे.ही समिती हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संमेलनासाठी घेण्यात आलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची बैठक अध्यक्ष अॅड संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा सचिव विठ्ठल कदम, ज्येष्ठ लेखिका उषा परब, सचिव प्रतिभा चव्हाण, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे ,तर मळेवाड ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच हेमंत मराठे,शिक्षक वर्ग व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. हे ग्रामीण भागात होणारे जिल्हास्तरीय बाल साहित्य संमेलनामध्ये मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष ॲड. संतोष सावंत व उपसरपंच हेमंत मराठे यांनी केले आहे.