सावंतवाडी,ता.२३: साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेल्या सावंतवाडी येथील साहित्यिक प्रविण बांदेकर यांना आज सावंतवाडी पत्रकार संघाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मला मिळालेला पुरस्कार हा अवघ्या कोकणचा सन्मान आहे, असे मत श्री. बांदेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
श्री. बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या पुस्तकाला भारतीय साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा म्हणून ओळखल्या जाणार्या साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल आहे. या पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी पत्रकारांच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रींय पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण मांजरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा मिडीया संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव संतोष सावंत, सदस्य हरिश्चंद्र पवार, मसुदा समितीचे अध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सावंतवाडी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, विजय देसाई, जेष्ठ पत्रकार मोहन जाधव, दिपक गावकर, मयुर चराठकर, भुवन नाईक तसेच राणी पार्वती देवी हायस्कुलचे प्राचार्य श्री. धोंड, प्राध्यापिका सुमेधा नाईक आदी उपस्थित होते.
Home आंतरराष्ट्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेते प्रविण बांदेकर यांचा सावंतवाडी पत्रकार संघातर्फे सन्मान…