सावंतवाडीची सुकन्या बनली अंतरराष्ट्रीय हवाई सुंदरी..

0
116

जिद्द आणि खडतर प्रवास करत यश संपादन: हर्षा देऊलकर वर कौतुकाचा वर्षांव

सावंतवाडी,दि.०८: लहानपणापासून हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सर्व परस्थीतीवर मात करत खडतर प्रवास करून सावंतवाडी सालईवाडा येथील सुकन्या हर्षा महेश देऊलकर हिने अंतरराष्ट्रीय हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केले आहे.तिच्या या यशाबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केले असून ती आपल्या नव्या प्रवासासाठी दोन दिवसापूर्वीच मुंबई येथे दाखल झाली आहे.
हर्षा देऊलकर हिचे दहावी पर्यंतचे शिक्षण येथील मिलाग्रीस हायस्कुलमधून झाले तर महाविद्यालयीन शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालया तून तिने घेतले.मात्र या शिक्षणानंतर खरी ओढ होती ती हवाई सुंदरी बनण्याचे त्यासाठी स्पर्धात्मक युगात खडतर अभ्यास आणि प्रचंड मेहनत घेणे महत्वाचे असते.पण तिने कष्ट केले तर फळ मिळणार म्हणत घरची परस्थीती बेताची असतानाही मागे वळून न पाहता शिक्षण घेतले.
याकाळात तिला अनेकांनी मदत केली तसेच आशीर्वाद ही दिले त्याच जोरावर तिने हवाई सुंदरी पदासाठी अंतिम परिक्षेत साठ विद्यार्थ्या मधून दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात हर्षा हिचा समावेश होता.तिच्या यशानंतर घरच्यांचा उर भरून आला.हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून हर्षा पुढे गेली आज ती त्या पदावर जाऊन पोचली याचा आम्हाला अभिमान असल्याचे तिचे वडिल महेश देऊलकर यांनी सांगितले.
हर्षा च्या यशात अनेकांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे तिचे वडिल म्हणाले यात प्रकाश मिशाळ, मनिषा मिशाळ वैशाख मिशाळ, दिलीप वाडकर,ॲड.परिमल नाईक अमित पोकळे, तनुजा पोकळे, वर्षा तेली, पल्लवी मुंज, प्रकाश सुकी, बंड्या कोरगावकर, भास्कर देऊलकर,किरण केसरकर, सुनिल कोरगावकर आदिसह अनेकांनी आर्शवाद दिल्याचे महेश देऊलकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here