कार्यक्रमाला उपअधीक्षक श्रीमती संध्या गावडे व युवा उद्योजक विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी, दि.३० : तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कुल कलंबिस्त या हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारीतोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि•०२ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे.
यानिमित्त विविध सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत.
यामध्ये “उधाण” २०२४ या कार्यक्रमात सायं ६•०० ते ७•०० :उद्घाटन,अहवाल वाचन व पारीतोषीक वितरण सायं ७•०० ते १०•०० विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीम•संध्या गावडे (पोलीस उपअधिक्षक,सावंतवाडी) व प्रमुख मान्यवर म्हणुन भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे उपस्थित राहाणार आहेत•
त्याच प्रमाणे जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर,कलंबिस्त सरपंच सौ•सपना सावंत,वेर्ले सरपंच सौ•रूचिता राऊळ,सावरवाड सरपंच सौ •देवयानी पवार,उपस्थित राहाणार आहेत•
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव व संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी केले आहे.