खा.विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी उद्धव ठाकरे कोकणात… शैलेश परब
सावंतवाडी,दि.२९ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये नवचेतना आणण्यासाठी आणि कोकणातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे त्यांचे न भूतो न भविष्यती असे स्वागत करा. खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक करायचे आहे असे आवाहन सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी गद्दारांना गाडून खासदार विनायक राऊत यांची विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन केले.
सावंतवाडी येथील आदिनारायण मंगल कार्यालय मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेत्या तथा महिला जिल्हा संघटक सौ.जान्हवी सावंत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे तालुका प्रमुख रुपेश राऊळ तालुका संघटक मायकल डिसोजा माजी सभापती रमेश गावकर माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी गावडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची नियोजन बैठक झाली.यावेळी शिवसेना उप तालुका प्रमुख बाळू माळकर राजू शेटकर संदीप पांढरे आबा सावंत शहर प्रमुख शैलेश गवंडळकर विभागप्रमुख आबा केरकर सुनील गावडे पुरषोत्तम राऊळ नामदेव नाईक फिलिप्स रॉडीक्स गुंडू राऊत विनोद काजरेकर प्रशांत बुगडे संदेश केळकर हिमांशू परब तसेच महिला तालुका संघटक भारती कासार,सौ झारापकर, महिला शहर संघटक श्रुतिका दळवी, सुरेश शिर्के आणि तालुका कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते
४ फेब्रुवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गोव्यातील मोपा विमानतळावरून वाहनाने सावंतवाडी येथे रवाना होतील त्यापूर्वी महाराष्ट्राच्या आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर बांदा येथे त्यांचे स्वागत होईल सावंतवाडीच्या सीमेवर माजगाव येथेही मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांचे स्वागत करतील सावंतवाडी शहरातील मध्यवर्ती गांधी चौकामध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील सकाळी ११ वाजता सावंतवाडी दाखल झाल्यानंतर ते कुडाळच्या दिशेने रवाना होतील. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे अंतिम कार्यक्रमाची रूपरेषा ३१ जानेवारीला स्पष्ट करणार असल्याचे शैलेश परब यांनी सांगितले.