गांधी विचार संस्कार परिक्षेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे उज्वल यश..!

0
91

मालवण,दि.०१: त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता.मालवण या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगांव आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत उज्वल यश संपादित केले असून या शाळेची इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी कुमारी कोमल भालचंद्र जंगले हीने इयत्ता दहावीमधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला असून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.तर दहावीची कु.साक्षी उमेश सर्पे हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे.तसेच इयत्ता आठवीच्या कु.अश्विनी भालचंद्र जंगले हिने आठवीमधून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे.या परिक्षेस एकूण ६१विद्यार्थी बसलेले होते.सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १००%निकाल लागला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक श्री.सावंत एस आर यांचे सर्व संस्था पदाधिकारी,शालेय समिती अध्यक्ष उत्तम गांवकर, सदस्य दिपक चव्हाण,दशरथ घाडीगांवकर,संतोष गांवकर, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य,शिक्षक पालक संघ पदाधिकारी व सदस्य, मुख्याध्यापक वामन तर्फे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मेडल प्राप्त विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच मार्गदर्शक शिक्षक सावंत एस एस आर आणि सहाय्यक काणेकर व्ही डी यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here