आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील आठ गावातील सहा ग्रामपंचायती मध्ये भाजपचे वर्चस्व..

0
115

माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांची जोरदार मुसंडी..

🎥KOKAN DARSHAN Digital Media
🌴कोकण एक स्वप्ननगरी🌴

✍️ सावंतवाडी : आनंद धोंड

🎴सावंतवाडी दि.२० : सह्याद्री पट्ट्यातील आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील आठ गावातील सहा ग्रामपंचायत मध्ये भाजपचे सरपंच विराजमान झाले असून भाजपचे जिल्हा परिषद मतदार संघात वर्चस्व निर्माण करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केल्यानंतर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. यामुळे जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
सह्याद्री पट्ट्यात आंबोली जिल्हा परिषद मतदार संघ येतो. या जिल्हा परिषद मतदार संघाचे नेतृत्व संदीप गावडे करत आले आहेत. आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात झालेल्या आठ गावातील सहा ग्रामपंचायती मध्ये भाजपचे सरपंच विराजमान करून संदीप गावडे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रचारात आघाडी घेतली होती. आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील गेळे, पारपोली, केसरी फणसवडे, सातोळी बावळट, देवसु दाणोली, भालावल या ग्रामपंचायतीत भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले असल्याचा दावा संदीप गावडे यांनी केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे हा विजय प्राप्त झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यामुळे पुन्हा एकदा संदीप गावडे यांनी आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात आपले वर्चस्व राखले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here