जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत करण्यात आला प्रवेश
सावंतवाडी, दि.१०: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चुरस दिवसेंदिवस वाढत चालली असून आज माजगाव ग्रामपंचायत च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला धक्का देत भाजपा मंडळ पदाधिकारी ॲड सचिन गावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला तसेच ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक एक मधील ललिता सोनाळकर यांनी याच पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवार पूजा गावडे यांना पाठिंबा व्यक्त केल्यामुळे या प्रभागात आता भाजप विरुद्ध बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी एकास एक लढत होणार आहे
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये भाजपाचे ॲड सचिन गावडे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये या प्रवेश कार्यक्रमांमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ माजी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार आबा सावंत सुनील गावडे तसेच राजन पाटकर नरहर शिरोडकर राहुल सोनाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून आणि भगवे शेले देऊन पक्ष प्रवेश करण्यात आला या पक्षप्रवेशांमध्ये महापुरुष महिला बचत गट, इसवटी महिला बचत गट तसेच जेष्ठ नागरिकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला प्रवेश प्रवेश करत्यामध्ये संदीप गावडे तातू सावंत रामदास गावडे वैदेही सावंत साक्षी सावंत शारदा सावंत अंजली गावडे मानसी नाईक यांनी प्रवेश केला यामध्ये उमेदवार ज्ञानेश्वर सावंत नकुल सावंत यांचीही उपस्थिती होती तसेच माजगाव ग्रामपंचायत च्या प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवारी अर्ज दाखल केलेली ललिता सोनालकर हिने आपले समर्थन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पूजा गावडे यांना दिले असून तिरंगी लढती ऐवजी आता दुरंगी लढत अपेक्षित आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आपण पूजा गावडे यांना समर्थन देत आहे त्यामुळे माजगाव ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण पॅनल सरपंचासह तेरा ही ग्रामपंचायत सदस्य निवडून येतील असा विश्वास पूजा गावडे यांनी या पक्ष प्रवेशानंतर बोलताना व्यक्त केला आहे.