दीपक केसरकर ; कोनाळकट्टा येथील कार्यक्रमात ओंकार कलामंचाचे छत्रपती देखाव्याचे कौतूक…
दोडामार्ग, ता.२० : प्रस्तावित बेंगलोर, बेळगाव, गोवा महामार्ग दोडामार्ग तालुक्यातून जाणार आहे. त्यामुळे परिसराचा आता गतीने विकास होणार आहे. त्यात कोनाळकट्टा येथे “अम्युझमेंटर पार्क” असल्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य आपण नक्कीच करेन, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला. दिपोत्सव समिती व तरुण मंंडळ आणि नवहौशी ठाकर समाज कलाक्रीडा मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दिपावली शो टाईमला श्री. केसरकर यांनी रात्री उशिरा भेट दिली. यावेळी त्या ठिकाणी सुरू असलेल्या ओंकार सांस्कृतिक कलामंचाच्या कलाकारांचे त्यांनी कौतूक केले.
यावेळी शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, शैलेश दळवी, गोपाळ गवस, परेश पोकळे, आप्पा कामत, मंडळाचे अध्यक्ष प्रितम पोकळे, रामा ठाकुर, आंनद आरोलकर, प्रविण ठाकुर, विजय ठाकुर, रुपेश ठाकुर, योगेश पांगम, संकेत पोकळे, ऋत्वीक पोकळे, संतोष शिरवलकर, विष्णू ठाकुर, डॉ. रामदास रेडकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.केसरकर म्हणाले, दोडामार्ग तालुक्याचा येत्या काळात झपाट्याने विकास होणार आहे. त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यात बेंगलोर, बेळगाव, गोवा हा महामार्ग या ठिकाणावरुन जाणार असल्याने या भागाचा झपाट्याने विकास होणार आहे. त्यामुळे आता आपसुकच या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. त्यामुळे याचा फायदा येथील जनतेने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंडळाच्या माध्यमातून श्री. केसरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेेळी त्या ठिकाणी शो टाईम निमित्त सुरू असलेल्या ओंकार कलामंचाच्या कार्यक्रमाचे तसेच पदाधिकारी अमोल टेंबकर, अनिकेत आसोलकर व अन्य सहकार्यांचे श्री. केसरकर यांनी कौतूक केले. विशेष म्हणजे कलामंचाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावर साकारण्यात आलेल्या नृत्याचा आनंद केसरकर यांनी घेतला. या नृत्यात स्वरुप कासार यांनी छत्रपतींची भूमिका साकारली होती.
यात नारायण पेंडुरकर, अभिषेक लाखे, साई हनपाडे, ओम टेंबकर, आदित्य हनपाडे, अतुल गावकर, किसन धोत्रे, हेमंत पांगम, सचिन मोरजकर, विशाल तुळसकर, चैतन्य सावंत, जॉय डान्टस, दिपेश शिंदे, आनंद काष्टे, रोहित पाळणी, सोनाली बरागडे, पूजा राणे, पूजा पारधी, अमिषा सावंत, रसिका धुरी, स्टेला डान्टस, भूमी धुरी, प्रणिता भर्डे, खुशी वेंगुर्लेकर, स्नेहा शिरसाट आदींनी सहभाग घेतला होता.