कोनाळकट्ट्यात गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

0
52

दोडामार्ग, दि.१७ : कोनाळकट्टा येथील नवहौशी ठाकर समाज कला-क्रिडा मंडळ व माऊली बहुउद्देशीय स़ंस्था कोनाळकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने दिपावलीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी, समाजातील पदोन्नती झालेले सरकारी कर्मचारी तसेच समाजातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी इ.१० वी व १२ वीतील उत्तीर्ण विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षा, विविध स्पर्धा मधील यशस्वी विद्यार्थी व उच्चशिक्षण प्राप्त अश्या २० विद्यार्थ्यांचा मंडळ व संस्थेच्यावतीने सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. तसेच ठाकर समाजातील सरकारी सेवांमध्ये पदोन्नती प्राप्त ८ समाजबांधवांही शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी समाजातील ६० वर्षावरील २९ ज्येष्ठ व्यक्ती, कष्टकरी महिला-पुरुष यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यामुळे आयुष्यभर केलेल्या कष्टाच्या ऋणातून थोडसं उतराई होण्याचा हा केलेला प्रयत्न म्हणजे मंडळ व माऊली संस्थेचा एक आगळा वेगळा उपक्रम ठरला. यावेळी कोनाळकट्टा ग्रामपंचायत सदस्य, मंडळाचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी मंडळासाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचाही शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या अनोख्या सत्कार सोहळ्याची संकल्पना मंडळ व माऊली संस्थेचे अध्यक्ष रामा विश्राम ठाकूर यांची होती. त्यांच्याच अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक रामा विश्राम ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन विजय ठाकर व प्रविण ठाकर यांनी केले.या कार्यक्राला कोनाळकट्टा येथील ठाकर समाजबांधव, मंडळाचे सर्व पदाधिकारी व माऊली बहुउद्देशीय संस्थेचे संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here