शिरशिंगे येथील युवा शेतकऱ्यांनी करुन दाखवलं..
सावंतवाडी,दि.०२: तालुक्यातील शिरशिंगे मळईवाडी येथील युवा शेतकरी संदीप राऊळ, आणि अमित राऊळ यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन भात शेतीमध्ये सुद्धा भरघोस उत्पादन घेता येते हे दाखऊन दिले.
शिरशिंगे मळईवाडी येथील शेतकरी संदीप अशोक राऊळ व
अमित मधुकर राऊळ यांनी भात पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या शेतावर पीक कापून धान्याचे मोजमाप केले.
संदीप अशोक राऊळ यांनी एस. आर. टी (SRT) पद्धतीने गादी वाफ्यावर भाताची लागवड केली व एक गुंठे क्षेत्रातून ६९ किलो एवढे उत्पादन मिळवले,तर अमित मधुकर राऊळ यांनी “श्री” पद्धतीने भात लागवड करून एका गुंठ्या
तुन ९१ किलोचे भरगोस उत्पादन मिळवले.
सध्या वातावरणातील बदल व शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. अश्यातूनच शिरशिंगे सारख्या ग्रामीण भागातील ह्या दोन तरुणांनी मनाशी गाठ बांधून नवीन तंत्रज्ञान वापरून भात पिकामध्ये सुद्धा भरगोस उत्पादन घेता येऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. सचोटी, प्रामाणिकपणा व मेहनत केली तर अशक्य असे काही नाही हे ह्या दोन्ही शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे….. आजच्या ह्या भात पीक स्पर्धा प्लॉट कापणीचे पर्यवेक्षण मंडळ कृषी अधिकारी श्रीमती. माधुरी राऊत यांच्या उपस्थितीत पार पडले.
गावातील इतर शेतकऱ्यांनी सुद्धा नवीन तंत्रज्ञान वापरून अश्या पद्धतीने शेती केल्यास निश्चितपणे फायदा मिळू शकतो.त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करून उत्पन्न मिळवावे असे आवाहन कृषी सहाय्यक अक्षय खराडे यांनी केले आहे.