कोलगाव मराठा समाजाची २ नोव्हेंबरला बाईक रॅली व एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..

0
182

सावंतवाडी,दि.३१: मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज कोलगाव मराठा समाज बांधवांची बैठक कोलगाव येथे सरपंच संतोष राऊळ,माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर,चंदन धुरी, मनोहर उर्फ पपू ठीकार, प्रशांत कोठावळे,सौ अपर्णा कोठावळे,अभिजीत टीळवे, शिवदत्त घोगळे,एल एम सावंत व सकल मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली,

गुरुवार २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता गावातून बाईक रॅली निघणार आहे व ठिक दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालया समोर एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात येणार आहे.
सदरची बैठक मेघश्याम काजरेकर यांच्या निवासस्थानी पार पडली,यावेळी,उपोषण व रॅली चे नियोजन करण्यात आले, प्रत्येक मराठा समाज बांधवांनी आपली मते मांडली,उठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या,गावातील रॅलीला व उपोषणाला बहुसंख्य मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी कैलास परब,प्रकाश म्हापसेकर, गुरुनाथ करमळकर, विश्वनाथ कोचरेकर, चंद्रकांत सावंत,मनोज घाटकर, मनोहर ठिकार,महादेव राऊळ, काशिनाथ करमळकर,प्रभाकर राऊळ,संदिप गवस,अनिल ठिकार,राजन ठाकुर,सुदेश राणे,राजेश राऊत, आकाश ठाकूर,आनंद राऊळ,प्रविण परब,नितेश ठाकूर,विश्राम सावंत,राकेश ठाकूर,प्रकाश धुरी, श्रीकृष्ण सावंत, तुकाराम म्हापसेकर, संतोष टिळवे,लक्ष्मण सावंत,वैभव परब, सचिन आधारी,लक्ष्मण धुरी,सागर धुरी,महेश धुरी,तानाजी म्हापसेकर, विशाल म्हापसेकर,अशोक म्हापसेकर,संदेश राऊळ,महादेव सावंत,विनायक परब, नरेंद्र राणे,रुपेश परब,सिध्देश सावंत,दिलीप टीळवे, सच्चिदानंद ठाकूर, बाळकृष्ण काजरेकर,बळीराम काजरेकर,आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here