मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कोकणातील युवकां समवेत घेण्यात आला कार्यक्रम..
दिल्ली,दि.३१: मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कोकण बेल्टमधून भाजप युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेले विशाल परब आणि प्रथमेश तेली यांनी कोकणातील भाजपच्या युवक कार्यकर्त्यांसह दिल्लीमध्ये कार्यक्रम सादर केला.
कोकण प्रांतातील भाजपच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांना दिल्लीमध्ये नेत त्यांनी हा उपक्रम साजरा केला.
यावेळी शेकडो भाजपचे कार्यकर्ते कोकणातून दिल्ली येथे दाखल झाले होते. महाराष्ट्र भाजप युवा प्रदेश मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विशाल परब आणि प्रथमेश तेली यांनी झंझावती कार्यक्रम घेत कोकणातील युवा शक्तीचे दिल्लीत शक्तिप्रदर्शन केले आहे.
आज दिल्लीमध्ये जात हा कार्यक्रम सादर करत भाजप पक्ष वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती यावेळी भाजप प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, प्रदेशचे कोकण प्रभारी प्रयास भोसले, प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब, प्रथमेश तेली,भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.