युवक आढळून आल्यास संपर्क साधण्याचे नातेवाईकांकडून आवाहन
सिंधुदुर्ग, दि.०४: गोवा उगवे येथील अक्षय फाटक (वय २६) हा युवक दोन दिवसापासून घरातून निघून गेला असून तो सद्यस्थितीत बेपत्ता आहे.त्याची मानसिक स्थिती अस्थिर असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.अक्षय ने शेवाळी रंगाचा फुल शर्ट व हाफ पॅन्ट असा पोशाख घातला आहे.काल संध्याकाळी बांदा इन्सुली येथे चेक पोस्टवर दिसल्याची माहिती होती.यावेळी इन्सुली चेक पोस्ट च्या जवळ एका दुचाकी ला हात दाखवून दुचाकीवर बसून अक्षय हा कुडाळच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली आहे.तरी अक्षयची कोणालाही माहिती मिळाल्यास अक्षयचा भाऊ यतीन फाटक याला 9404507368 वर फोन करून माहिती द्यावी. असे आवाहन नातेवाईकांकडून देण्यात आले आहे.