सावंतवाडी,दि.२४: येथील मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या गणपती बाप्पा चे शालेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाचव्या दिवशी पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन केले.
यावेळी राज्यातील जनतेला सुखी ठेव, सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभो असे साकडे त्यांनी श्रींच्या चरणी घातले.
विसर्जनासाठी खास घराच्या परिसरात व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, शितल केसरकर, गणेश भोगटे, अमित केसरकर, अशोक केसरकर, युगा केसरकर आदी उपस्थित होते.
Home ठळक घडामोडी मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पुजलेल्या बाप्पाचे पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन..