सिंधुदुर्ग,दि.२४: येथील माजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी सह वेंगुर्ले तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरोघरी गणरायाचे दर्शन घेतले. मनसे पदाधिकाऱ्यांकडून श्री उपरकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी मनसे विद्यार्थी सेनेच्या आरती संग्रहाचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर विद्यार्थीसेना जिल्हा सचिव निलेश देसाई सहसचिव आबा चिपकर तालुकाध्यक्ष संदेश सावंत स्वप्निल कोठावळे मंदार नाईक प्रकाश साटेलकर नंदू परब सुनील नाईक ज्ञानेश्वर नाईक आदी उपस्थित होते.
Home ठळक घडामोडी मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी सह वेंगुर्ले तालुक्यातील बाप्पांचे घेतले...