सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तावडे यांनी केला होता पाठपुरावा… कोकण दर्शन डिजिटल मीडिया चॅनेल च्या बातमीचा परिणाम..
सावंतवाडी,दि.०२: तालुक्यातील कलंबिस्त लिंगेश्वर मंदिर ते मळा येथील रस्त्याच्या दुतर्फा गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत होते.
त्यामुळे रस्त्यावरून शाळकरी मुलांना व ग्रामस्थांना चालत जातांना याचा त्रास होत होता.
याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तावडे,रॉयल बुलेट मंडळ कलंबिस्त घनशळवाडी व शिव स्वराज्य मित्र मंडळ कलंबिस्त मळा यांनी आवाज उठवल्यानंतर व कोकण दर्शन डिजिटल मीडिया या चॅनलच्या बातमीनंतर संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गटार खोदकाम कामाला सुरुवात केल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान १५ ऑगस्ट रोजी बांधकाम कार्यालयासमोर होणारे उपोषण स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तावडे यांनी दिली आहे.