येत्या दोन दिवसात सेवा सुरळीत न केल्यास ग्रामस्थांचे आंदोलन…
सावंतवाडी,दि.०८: तालुक्यातील शिरशिंगे गावात गेले तीन दिवस बीएसएनएल ची सेवा ठप्प आहे.
मात्र येथील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढारी यांचा दुर्लक्ष असल्यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.
हा गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने या गावात पावसाळ्यात सर्रास भूस्खलन होत असतं अशा वेळेस कोणतेही आपत्ती उद्भवल्यास येथे दूरध्वनी संपर्क अभावी मोठी गैरसोय होऊ शकते.
असं झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित बीएसएनएल खात्यातील अधिकारी असतील, आणि येत्या दोन दिवसात बीएसएनएल ची सेवा सुरळीत न झाल्यास शिरशिंगे गावातील युवक आणि ग्रामस्थ एकत्र येऊन सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात आंदोलन छेडतील अशी प्रतिक्रिया येथील युवाशक्ती गटाने दिली आहे.