सावंतवाडी,दि.०७ : तालुका पत्रकार संघ,सावंतवाडी वनविभाग आणि आर पी डी काँलेज यांच्या संयुक्त विद्यमाने “जल संवर्धन” सप्ताहानिमित्त जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी दि.०७ जुलै रोजी सायंकाळी ३.३० वाजता काँलेज सभागृह आणि परिसरात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांमध्ये जलसंवर्धनाबाबत निवृत्त प्राचार्य श्री गिरीधर परांजपे हे मार्गदर्शन करणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री विकासभाई सावंत प्रमुख पाहुणे,उपवनसंरक्षक श्री नवल किशोर रेड्डी,श्री उमेश तोरस्कर,जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ, सहाय्यक वनसंरक्षक डॉ सुनील लाड, सावंतवाडी वनक्षेत्रपाल श्री मदन क्षिरसागर प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री जगदीश धोंड यांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री हरिश्चंद्र पवार यांनी केले आहे.