सिंधुदुर्ग,दि.२८: आज रविवार दिनांक २८ मे २०२३ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील किल्ले निवतीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत झाडीने व्यापलेल्या किल्याच्या मुख्य दरवाजा व बुरुज यांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत गणेश नाईक, समिल नाईक, पंकज गावडे, शिवाजी परब, योगेश येरम, शितल नाईक, विशाल परब, धोंडी परब, यश परब, सतिश नाईक, सदा घाडी, अक्षय सावंत, मयुरी जोशी आदींनी सहभाग घेतला.
या मोहिमेसाठी संतोष पारधी यांनी सॉ कटर उपलब्ध करून दिला. सर्व सहभागी मावळ्यांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार मानण्यात आले.