प्रिन्सि रायकर पार्लरच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
150

मिस प्रिन्सेस २०२३ ताज च्या मानकरी शुभ्रा सावंत तर पैठणीच्या विजेत्या ठरल्या पूजा पेडणेकर

सावंतवाडी,दि.२८: येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे , प्रिन्सी रायकर पार्लर च्या माध्यमातून २३ मे रोजी खेळ पैठणीचा, फॅशन शो व मिस प्रिन्सेस २०२३ असा प्रकारचे विविध कार्यक्रम घेण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
फॅशन शो मध्ये शुभ्रा सावंत यांचा प्रथम क्रमांक, साक्षी पाटकर द्वितीय तर नंदिनी बिले तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
तर काही वैयक्तिक स्पर्धेमध्ये बेस्ट आऊटफिट स्नेहा शिरसाट, बेस्ट स्माईल रसिका धुरी, बेस्ट कॅटवॉक भार्गवी पांगम तर खेळ पैठणीचा या स्पर्धेच्या मानकरी ठरल्या पूजा पेडणेकर,सेमी पैठणीच्या विजेत्या ठरल्या शमिका मालवणकर.
या सर्व विजेत्यांना प्रिन्सि रायकर पार्लरच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिके व भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये प्रथम पारितोषकामध्ये सोन्याची नथ, क्राऊन आणि सन्मान चिन्ह व द्वितीय पारितोषकामध्ये एक ग्रॅम सोन्याचा हार क्राऊन आणि सन्मानचिन्ह तर तृतीय पारितोषक मिळवणाऱ्यांना दहा ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात आले.
वैयक्तिक पारितोषकांमध्ये प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू तर कार्यक्रमाचे आकर्षण असलेल्या होम मिनिस्टर या स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या स्पर्धकाला मानाची भरजरी पैठणी व मोत्यांचा नेकलेस सेट देऊन गौरवण्यात आले. तर द्वितीय व तृतीया क्रमांकाला अनुक्रमे पैठणी व चांदीचे नाणे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रिन्सि रायकर पार्लर च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शहरातील महिला वर्गांला एक वेगळे व्यासपीठ मिळाले, त्यांनी घेतलेल्या या कार्यक्रमाचे उपस्थित महिला वर्गाने कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here