व्यक्त व्हा “आठवणी” जागवा कोमसापचा नाविन्यपूर्ण उपक्रमातून.

0
182

जुनी सावंतवाडी नव्या पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न… ॲड.संतोष सावंत

………………………………………
KOKAN DARSHAN  Digital Media
कोकण एक स्वप्ननगरी ……………………..

सावंतवाडी,०६ : कोकण आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की सर्वप्रथम महाराष्ट्रात अग्र क्रमांकाने नाव घेतले जाते .ते संस्थानकालीन सावंतवाडी शहराचे हे शहर  लाकडी खेळण्यासाठी जग प्रसिद्ध शहर म्हणून ओळखले जात आहे. अशा या सुंदरवाडी सावंतवाडी शहराची जुनी ओळख आगळी वेगळी होती .या जुन्या सावंतवाडी बद्दल व्यक्त व्हा आठवणी जागवा जुन्या सावंतवाडी शहराच्या असा नाविन्यपूर्ण उपक्रम कोकण मराठी साहित्य परिषदे सावंतवाडी शाखेच्या वतीने घेण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सावंतवाडी येथील केशवसुत कट्ट्यावर जुन्या जाणत्या व्यक्तीने अनुभवली सावंतवाडी त्यांनी आपल्या शब्दात सावंतवाडीच्या आठवणी जागवायच्या आहेत .असा हा उपक्रम घेण्यात येणार आहे .अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड.संतोष सावंत यांनी दिली . कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखे ची बैठक सावंतवाडी येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील कक्षात घेण्यात आली या बैठकीत व्यक्त व्हा आठवणी जागवा जुन्या सावंतवाडीच्या असा उपक्रम घेण्याबाबत नियोजन करण्यात आले या बैठकीत उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे सचिव प्रतिभा चव्हाण सहसचिव राजू तावडे ज्येष्ठ सदस्य ॲड.नकुल पार्सेकर सदस्य दीपक पटेकर सुभाष गोवेकर आधी उपस्थित होते व्यक्त व्हा आठवणी जागवा सावंतवाडी शहराच्या या उपक्रमाबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जुनी सावंतवाडी शहरातील ओळख याबाबत काही टिप्स सुचवले आहेत त्या अनुषंगाने जुन्या सावंतवाडी शहरातील काही आठवणी जुन्या जाणत्या व्यक्तीला माहित आहे तो त्यांनी अनुभवले आहेत त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यातील आठवणी दीडशे वर्षांपूर्वीचे श्रीराम वाचन मंदिर काकू पडते जानकी सुतिकाबाई रुग्णालय एसटी स्टँड झाप्यांचा जुने नाट्यगृह विडी कारखाना जुने थिएटर्स आधी राजकीय सामाजिक संगीत नाट्य अशा विविध क्षेत्रातील जुनी ओळख जुनी आठवण ज्याने स्वतः अनुभवले आहेत त्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन आठवणी जागवाव्यात ज्याना आपल्या आठवणी जाग व्हायच्या आहेत त्यांनी आपली नावे सहसचिव राजू तावडे9422584407 व विनायक गावस एडवोकेट नकुल पार्सेकर याच्याकडे १५ नोव्हेंबर पर्यंत आपली नावे नोंदवावी तसेच कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा च्या सदस्यांकडे नावे द्यावीत आधी सावंतवाडी शहरातील सांस्कृतिक साहित्य चळवळ पुढे नेण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे नवीन युवा साहित्यिक निर्माण करण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवण्यात येणार आहेत व्यक्त व्हा आठवणी जागवा जुन्या सावंतवाडीच्या या उपक्रमातून जुनी सावंतवाडी नव्या पिढीसमोर ठेवण्याचा संकल्प आहे जास्तीत जास्त सावंतवाडीकारांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here