शाल श्रीफळ देऊन करण्यात आला सन्मान..
सिंधुदुर्ग, दि. ०५ : येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखपदी चंद्रकांत कासार व सावंतवाडी तालुका संघटकपदी मायकल डिसोजा यांची निवड करण्यात आली. या दोघांचा शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अतुल रावराणे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे,खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबुल ठाकूर, अरुण गावडे, रमेश गावकर, जॅकी डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते.