डॉ. परुळेकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी…
सावंतवाडी,दि.०७: समाजात वावरत असताना ८०%टक्के समाजकारण आणि २०%राजकारण या तत्त्वाचा अवलंब करुन गेली कित्येक वर्षे डॉ. परुळेकर समाजसेवेचे काम करत आहेत, त्यांनी आज जागतिक आरोग्य दिनादिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील आठ गरजू रुग्णांना सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश आर्थिक मदत म्हणून प्रदान केले.
सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे उत्कर्षा गावडे,निगुडे येथील मोहिनी कोरगावकर, बांदा येथील ऋतुजा कीर, वेर्ले येथील गिरीजा कदम, विश्वास सावंत, मनोहर सावंत, संदीप सातोसकर व अरूण राऊळ या आठ गरजू रुग्णांना डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते हे धनादेश देण्यात आले.
यावेळी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत व सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी संस्थेचे रवि जाधव उपस्थित होते.
नजिकच्या काळात अजून अनेक गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यात येईल असे यावेळी बोलताना डॉ परूळेकर यांनी सांगितले.