सावंतवाडी मध्ये वृत्तबद्ध कविता ते गझल कार्यशाळेचे १४ मे रोजी आयोजन

0
86

सावंतवाडी,दि.७ : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने” वृत्तबद्ध कविता ते गझल “कार्यशाळेचे आयोजन सावंतवाडी मध्ये दि.१४ मे रोजी करण्यात येत आहे. त्यासाठी नांव नोंदणी करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे मार्गदर्शक काव्यगुरू-कवी-गझलकार विजय जोशी (विजो) ( डोंबिवली, मुंबई ) आहेत. एकदिवसीय प्रत्यक्ष कार्यशाळा रविवार दि. १४ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सावंतवाडी येथे संपन्न होईल.इच्छुकांनी आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करावी, म्हणजे नियोजन करणे सोयीचे जाईल, असे म्हटले आहे.
या”कार्यशाळेतील अभ्यासक्रम :मात्रा म्हणजे काय, त्या कशा मोजतात आणि त्याचा सराव.
वृत्त म्हणजे काय, मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त, अक्षरछंद यांची माहिती आणि सराव. गझलतंत्र आणि सराव. प्रश्नोत्तरे आणि खुली चर्चा.
या कार्यशाळेतील उपस्थितांचा वेगळा व्हाट्सप समुह बनवून तिथे जवळपास पुढील दोन महिने विविध वृत्तातील कविता, गझल रचना यांचा सराव आणि यासंबंधीचा इतर अभ्यास ऑनलाईन घेतला जातो.
कार्यशाळेसाठी फी रु. ४००/- प्रती व्यक्ती ठेवण्यात आला आहे.(यामध्ये सकाळी चहा/न्याहारी, दुपारी भोजन व इतर खर्च समाविष्ट)
या कार्यशाळा नावनोंदणीसाठी संपर्क:-
श्री.दीपक पटेकर:- ८४४६७४३१९६ / ९४२१२३७५६८
श्री.संतोष सावंत
तालुकाध्यक्ष,कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी.९४२३०५१५३०नाव नोंदणी होताच समूह बनवून इतर माहिती दिली जाईल, असे दिपक पटेकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here