ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरे कडून आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
166

सावंतवाडी, दि.१३ : महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने सुदर्शन सभागृह,मळेवाड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.या कार्यक्रमाचा शुभारंभ तळवडे येथील डॉ.नेहा दत्तात्रय भिसे कांडरकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना डॉक्टर कांडरकर यांनी महिलांना वेगवेगळे उद्योग संदर्भातील माहिती देत असताना महिलांनी उद्योजक बनावे असे आवाहन केले.तसेच आपणाला कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण हवा असल्यास आपण माझ्याशी संपर्क करावा असे सांगत महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणं सध्या गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.तर प्रमुख पाहुणे प्रविणा आपटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या महिला दिनाला महिलांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दाखवत महिला दिन यशस्वी करण्यासाठी मोलाची कामगिरी केली.त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.तसेच पुढील वर्षी याहीपेक्षा मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.
या शुभारंभ प्रसंगी उपसरपंच हेमंत मराठेग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव तात्या मुळीकसानिका शेवडे,प्रवीणा आपटे,ग्राम संघाचे पदाधिकारी,सीआरपी व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पाककला स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद ते तब्बल ७१ महिला स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.आयोजित केलेल्या खेळ पैठणीच्या स्पर्धेत तब्बल ३० महिलांनी सहभाग घेत ही स्पर्धा यशस्वी केली.त्यानंतर संगीत खुर्ची,लिंबू चमचा स्पर्धा पार पडल्या.
महिला दिनानिमित्त आयोजितकेलेल्या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे
खेळ पैठणीचा
प्रथम – ऋतुजा मोरजकर
द्वितीय – तेजश्री पेडणेकर
तृतीय – श्वेता रेडकर
पाककला स्पर्धा
प्रथम – समिधा गोविंद राऊत
द्वितीय – अँनी फ्रान्सिस फर्नांडिस
तृतीय – श्रीमती सुवर्ण गणपत सातार्डेकर
उत्तेजनार्थ – सौ सीमा संतोष कुंभार
संगीत खुर्ची महिला
प्रथम – इंद्रावती केरकर
द्वितीय – प्राची मुळीक
संगीत खुर्ची मुली
प्रथम – मंदा नाईक
द्वितीय – लतिका काळोजी
लिंबू चमचा
प्रथम — रश्मी नाईक
महिला दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना ग्रामपंचायत सदस्य सानिका शेवडे,प्रवीण आपटे,जानकी शिरसाट,प्राची मुळीक,वैष्णवी मुळीक, ईशा काळोजी यांच्या शुभ हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेचे सूत्रसंचालन हेमंत मराठे यांनी केले.कार्यक्रमासाठी विनामूल्य हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉल मालक प्रशांत आपटे यांचे ग्रामपंचायत कडून विशेष आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here