रस्त्यात पडलेली बॅग केली पोलिसांच्या स्वाधीन…
सावंतवाडी,दि.१० : येथील माडखोल येथे रस्त्यात सापडलेली बॅग सांगेली सरपंच लवू भिंगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली. हा प्रकार काल गुरुवारी घडला. संबंधित बॅग ही मुणगेकर नामक महिलेची आहे. त्यात त्यांची महत्त्वाची कागदपत्रे व रोख रक्कम होती.
ही बॅग सांगेली गावचे सरपंच लवू भिंगारे यांना मिळाली. यावेळी त्यांच्या सोबत सांगेली गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत सनाम, अनंत भिंगारे तसेच ॲड. गुरुनाथ आईर आदी उपस्थित होते. यावेळी ती बॅग आणून दिल्याबद्दल पोलीसांनी त्यांचे आभार मानले. तसेच ती बॅग पेंडूर गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे यांच्याशी संपर्क साधून परत नेण्याचे आवाहन केले.